१. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
२. अर्जदार हा इतर मागासवर्गीय श्रेणीतील असावा.
३. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
४. अर्जदारांनी शालान्त पूर्व श्रेणीमध्ये शासनाकडून मंजूर केलेल्या शैक्षणिक कोर्सचा पाठपुरावा केला पाहिजे.
५. जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षाचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल, परंतु पुढील उच्च श्रेणीत त्याला बढती मिळत नाही तोपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
६. केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंड च्या माध्यमातून येणे आवश्यक आहे.
७. केवळ दोन अपत्य
i) मुलींसाठी हि अट बंधनकारक नाही
ii) एका पालकची जास्तीत जास्त 2 मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र
असतील.
८. दुसरी कुठलीही शिष्यवृत्ती / वेतनरोख स्विकारल्यास या शिष्यवृत्ती योजने अंतर्गत अंतर्गत अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
९. चालू वर्षासाठी ७५% उपस्थिती अनिवार्य आहे.
१०. अर्जदाराने व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र नसेल परंतु बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
११. एक कोर्स पूर्ण होईपर्यंत अर्जदाराची शिष्यवृत्ती / फ्रीशिप चालू राहील. उदाहरणार्थ - ११ वी, १२ वी कला - बी. ए., एम. ए., एम. फिल., पी.एच.डी., इत्यादी. अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. पूर्ण केले तर आणि नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यानंतर, एम.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्तीसाठी परवानगी दिली जाणार नाही. पण बी.एड. नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश केल्यानंतर ते शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
१२. विशेष व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ घेतला असल्यास आणि दरम्यान सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित अर्जदारास पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
हे पण वाचा....महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (OBC) जातींची यादी
0 टिप्पण्या