हिंदू पंचांगानुसार पंधरवड्यातल्या अकराव्या तारखेला एकादशी असे म्हणतात. पौर्णिमेनंतर एक आणि अमावस्येनंतर एक याप्रमाने ही तारीख महिन्यात दोनदा येते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या एकादशीला कृष्ण पक्षाची एकादशी आणि अमावस्येनंतर येणाऱ्या एकादशीला शुक्ल पक्षाची एकादशी म्हणून ओळखली जाते.प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादश्या येतात.
शुक्ल पक्षातील एकादश्यांची नावे :
1. कामदा
2.मोहिनी
3.निर्जला
4.शयनी
5. पुत्रदा
6.परिवर्तिनी
7.पाशांकुशा
8प्रबोधिनी
9.मोक्षदा
10.पुत्रदा
11.जया
12.आमलकी
कृष्ण पक्षातील एकादश्यांची नावे :
1.वरूथिनी
2.अपरा
3.योगिनी
4.कामिका
5.अजा
6.इंदिरा
7.रमा
8.उत्पत्ती
9.सफला
10.षट्तिला
11.विजया
12.पापमोचनी.
0 टिप्पण्या